माणसाने ‘उभ्या’ला ‘आडवे’ म्हणू नये, तसे ‘पाडवा’ या सणालाही पाडवा न म्हणता ‘गुढी उभारनी’ असे म्हणावे!
‘पाडवा’ हा शब्द जसा गुढीला छेद देतो, म्हणजे पाडवा याचा अर्थ पडून जाणे असा असूनही गुढी मात्र उभारली जाते. तसाच आड हा जमिनीच्या पोटात सरळ खोल असा उभा गेलेला असूनही लोक त्याला आड म्हणजे आडवा म्हणतात, अशी टिपणी बहिणाबाई चौधरी करतात. आणि ज्या लोकांनी आड आणि पाडवा अशा उलट्या संज्ञा तयार केल्यात, ते लोक भांगेच्या नशेत होते की काय अशी आपली शंका बोलून दाखवतात.......